Featured Articles by Vaishali Deshmukh
विद्यार्थ्यांनों यशस्वी उद्योजक बना - वैशाली देशमुख
बदलत्या काळानुसार या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या आमाशी जगात जास्तीचे रममान होण्याऐवजी यशस्वी उद्योजक बनवून दाखवले पाहिजे. कारण आपल्या ज्ञानाचा उपयोग करून काळ, वेळेचे बंधन पाळून स्वतःचे आयुष्य, कुटुंब, समाज आणि देशाचे उज्ज्वल असे भविष्य बनवले पाहिजे ?
हिरकणीची साद कोणी ऐकेल का?
आई तू ये ना गं मला घ्यायला… मला खूप आठवण येतेय तुझी… तू आली नाहीस ना, तर मी आता जेवणारच नाही…’ आईचे हृदय पिळवटून टाकणारे सहा वर्षाच्या चिमुरड्याचे हे बोल! लॉकडाउनमुळे आई-बाबा पुण्यात, तर मुलगा लातूरमध्ये अडकला आहे. आई स्वतःची समजूत घालेल, लेकराला कसे समजावणार?
एकमेकांप्रतिचा आदरभाव जगण्यातच खरे समाधान
मुळात पती-पत्नी ही एकाच गाडीची दोन वेगवेगळी चाके आहेत. ती व्यवस्थित असली तर संसाराची गाडी व्यस्थित धावते. भलेही कधी खडखडाट झाली तरी तिची दिशा भरकटत नाही की मार्गही चुकत नाही. जीवनातले समाधान अन् संसारातील सार्थकता साधायची असेल तर पती-पत्नीने एकमेकांना समजून घेत व
लातूरकरांच्या आनंदाला आले भरते
वैद्यकीय प्रवेशासाठीची ७०:३० ची अट रद्द करण्यात आल्याने मराठवाड्याला आनंदाचे भरते आले. या ऐतिहासिक निर्णयाचे एकमेकांस पेढे भरवून येथील विद्यार्थी व पालकांनी स्वागत केले. सरकारने घेतलेला हा निर्णय व तो पारित करण्यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दाखवलेली एकजूट काय करू शकते हेही या निमित्ताने उमगले. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी पार पाडलेली भूमिका मराठवाड्यासाठी सोन्याचा दिवस ठरली असे गौरवोद्गार काढत अगदी विरोधकांनीही त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करीत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. गुणवत्तेचे लोकशाहीकरण झाले असाच भाव सायांच्या अंतरंगात या निमित्ताने दाटून आला होता.
कौशल्या अकॅडमीचे जेईई ॲडव्हान्स परीक्षेत कौशल्य
लातूर पॅटर्नचा आज देशभरात बोलबाला आहे. मुळात या पॅटर्नचे मुख्य कर्तव्य हे आहे की, सर्वसामान्य गोरगरिब कुटूंबातील मध्यम गुणवत्त विद्यार्थ्यांना आपल्या आलिशान महाविद्यालयात प्रवेश देवून ज्यांना गुणवत्तेच्या शिखर पोहचविण्याचे कौशल्य दाखवणे असे असताना मुळातच हूणार विद्याथ्र्यांना प्रवेश द्यायचा भरमसाठ फीस वसूल करायची आणि आम्ही पॅटर्न जपतो म्हणून टिमकी मिळवायची. हा कसला पॅटर्न असा सवाल कौशल्या अकॅडमीच्या संचालिका वैशाली देशमुख यांनी आनंद नगरीशी बोलताना उपस्थित केला
टॉप करण्यासाठी 'मार्क' नव्हे 'कौशल्या' हवे
पूर्वी दहावीसाठी ओळखला जाणारा ‘लातूर पॅटर्न’ आता IIT, मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसाठी संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिध्द आहे. याच ‘लातूर पॅटर्न’ मधले एक टॉपचं नाव म्हणून ओळखली जाणारी कौशल्या अकॅडमी. तशी ही अकॅडमी अगदी अलीकडची म्हणजे दोन-तीन वर्षांपूर्वीची, पण याच दोन-तीन वर्षांत कौशल्याने मिळवलेले यश सर्वच पालकांचे डोळे दिपवणारे आहे. ते यश म्हणजे कौशल्या अकॅडमीची पहिली ‘संपूर्ण’ बँच मागच्या वर्षी JEE ॲडव्हान्स साठी क्वॉलिफाय झालेली आहे. पण हा चमत्कार एका रात्रीत घडलेला नाही तर त्यापाठीमागे कौशल्या अकॅडमीच्या संचालिका वैशाली देशमुख व इतर सर्व संचालक आणि कौशल्याचे अनुभवी शिक्षक यांच्या परिश्रमातून साकार झालेले ‘लर्न टू टॉप’ हे टेक्निक आहे.
पालकत्व आणि मुलांची जडणघडण
करिअर घडविण्यासाठी मुलांमध्ये वैचारिक शिस्त असायला हवी यासंदर्भातील विवेचन आपण वाचले असेलच आणि त्यासाठी पालकांनी काय करायला हवे याबाबतही मी आपल्याला मार्गदर्शन केले होते. वैचारिक शिस्तीचा हा पाया जर भक्कम असेल तर तो पाल्य आयुष्यात खूप मोठी उंची गाठू शकतो,
क्लास निवडताना e-Learning आणि e-Teaching मधला फरक लक्षात घ्या!
कोरोनामुळे मुलांच्या अभ्यासाचे २-३ महिने वाया गेले. आता अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार?
वैशाली मॅडम हे खरं आहे की, कोरोनामुळे मुलांचा अभ्यास थोडा मागे पडला आहे. पण अजूनही ही चिंतेची बाब नाही. कारण कौशल्या अकॅडमीमध्ये यावरचं सोल्यूशन तयार आहे. आणि तसंही ह्या विद्यार्थ्यांची IIT-JEE किंवा NEET परीक्षा 2022 मध्ये आहे. तोपर्यंत कौशल्या अकॅडमीमधील दैनंदिन, साप्ताहित महिना आणि पूर्ण वर्षभराच्या प्लॅनिंगप्रमाणे व आमच्या सिस्टिमनुसार आम्ही मुलांकडून सर्व अभ्यास वेळेत पूर्ण करून घेऊ, याबद्दल खात्री बाळगा.
पालकत्व 'आऊटसोर्स' करता येईल का?
कौशल्या अकॅडमीची संचालिका म्हणून जरी मी काम करत असले तरी विद्यार्थ्यासोबतच मलाही अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेत असतानाच माझाही विद्यार्थ्यांविषयीचा चांगलाच अभ्यास होत आहे. आणि अभ्यास म्हटलं की, प्रश्न तर पडणारच. त्यातलाच सध्या भेडसावणारा आणि प्रमुख प्रश्न म्हणजे पालकत्वाचा. बन्याच पालकांची अवस्था मुळात ‘पालकत्व म्हणजे काय रे भाऊ?’ अशी मला दिसते.